दुसरी टेस्ट जिंकली, पण तिसऱ्याचं काय? टीम इंडियामध्ये अजूनही जाणवतायत `या` कमतरता
India vs England Test Series: टीम इंडियाने ( Team India ) दुसरा सामना जिंकला असला तरी अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्यांना सुधारणं आवश्यक आहे.
India vs England Test Series: भारत विरूद्ध इंग्लंड ( India vs England Test Series ) यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमध्ये ( India vs England Test Series ) पहिल्या सामन्यात इंग्लंडचा विजय झाला तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 106 रन्सने इंग्लंडचा पराभव केला. दरम्यान तिसरा टेस्ट सामन्या 15 फेब्रुवारी रोजी रंगणार असून टीम इंडियामध्ये काही प्रमाणात कमतरता असल्याचं अजूनही दिसून येतंय. जाणून घेऊया टीम इंडियामध्ये ( Team India ) नेमक्या कोणत्या कमतरता आहेत.
टीम इंडियाने ( Team India ) दुसरा सामना जिंकला असला तरी अजूनही काही गोष्टी अशा आहेत ज्यांना सुधारणं आवश्यक आहे. विझाग टेस्टमध्ये जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि आर. केवळ अश्विनलाच यांनी चांगली कामगिरी केली. मात्र उर्वरित भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी चांगला होताना दिसली नाही.
टॉप ऑर्डरमध्ये खेळाडूंची सातत्यपूर्ण कामगिरी नसणं
टॉप ऑर्डरमध्ये यशस्वी जयस्वालने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र दोन्ही टेस्टमध्ये कर्णधार रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आलेली नाही. सध्या सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये रोहित शर्माला एकूण चार डावांमध्ये 22.50 च्या सरासरीने 90 रन्स करता आलेत.
मिडल ऑर्डरच्या खेळांडूंची वाईट कामगिरी
दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) मिडल ऑर्डरने म्हणावी तशी चांगली कामगिरी केलेली नाही. श्रेयस अय्यरच्या बॅटला सूर गवसताना दिसत नाहीये. 4 डावांमध्ये अय्यरला केवळ 104 रन्स करणं शक्य झालं आहे. तर दुसरीकडे डेब्यू करणाऱ्या रजत पाटीलादारला देखील चांगला खेळ करता आला नाही.
गोलंदाजी डिपार्टमध्ये बरीच कमतरता
इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या टेस्ट सिरीजमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्तम कामगिरी करत चार डावात 15 विकेट्स घेतल्यात. मात्र यावेळी बुमराहला इतर कोणत्याही गोलंदाजाची साथ मिळताना दिसत नाहीये. मोहम्मद सिराज किंवा मुकेश कुमार या दोघांचीगी कामगिरी सध्या वाईट असल्याचं दिसून येतंय.
भारत-इंग्लंड सिरीजचं उर्वरित सामन्यांचं शेड्यूल
तिसरी टेस्ट: 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी टेस्ट: 23-27 फेब्रुवारी, रांची
5वी टेस्ट: 7-11 मार्च, धर्मशाला