`मी `तशा` पद्धतीने बॅट पकडली अन् सलग दोन शतके ठोकलीत`
स्टीव्ह स्मिथच्या बॅक टू बॅक सेंच्युरी मागचं फॉर्ममध्ये गुपित आलं समोर, स्मिथने केला मोठा खुलासा!
Steve Smith : ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत जावून बसणाऱ्या स्टीव्ह स्मिथची सध्या मोठी चर्चा आहे. बिग बॅश लीगमध्ये स्मिथने सलग दोन शतके मारत त्याने फक्त कसोटीच नाहीतर टी-20 क्रिकेटही शिल्लक असल्याचं दाखवून दिलं आहे. बीबीएलमध्ये (BBL) खोऱ्याने धावा करत स्मिथने संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. स्मिथच्या या 'बॅक टू बॅक सेंच्युरी' आणि फॉर्ममध्ये येण्यामागे एक गुपित असल्याचं समोर आलं आहे.
मी टेनिस रॅकेट ज्या पद्धतीने पकडतो त्याला माहित नाही काय म्हणतात पण तशा पद्धतीने क्रिकेटची बॅट पकडत आहे. मला याचा फायदा असा होत आहे की, बॉल दूरवर आणि गॅपमध्ये मारायला मदत होत असल्याचं स्टीव्ह स्मिथने सांगितलं. आता गेल्या 10 ते 12 महिन्यांमध्ये आणि याआधीची माझी चार ते पाच वर्षांपूर्वी बॅट पकडण्याचं फुटेज पाहिलं तर तुम्हाला फरक दिसून येईल असं स्मिथ म्हणाला.
मला वाटतं की मी योग्य वेळी बॅट पकडण्याची पद्धत बदलली. यामुळे मी क्रीजवर जास्तवेळ टिकू शकतो आणि सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये उत्तम फलंदाजी करू शकतो. आशा करतो की यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मदत करू शकेल, असंही स्मिथने म्हटलं आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी होणार आहे. यामधील पहिल्या जोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्याआधी स्मिथने ठोकलेल्या दोन शतकांमुळे भारतीय संघासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.