IND vs NZ: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या गमतीशीर स्वभावामुळे नेहमी ओळखला जातो. मैदानाबाहेरच नाही तर मैदानात देखील त्याचा हा हटके अंदाज प्रसिद्ध आहे. चाहत्यांना देखील त्याचा हा अंदाज खूप आवडतो. दरम्यान याची प्रचिती आजच्या सामन्या देखील पहायला मिळाली. भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना रायपूरच्या स्टेडियमवर खेळवला जातोय. यामध्ये कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media viral Video) होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम म्हणजे टॉस दरम्यान रोहित शर्मा काय निर्णय घ्यायचा हेच विसरला होता. तर फिल्डींगसाठी मैदानावर उतरल्यानंतर आकाशात उडणाऱ्या एका गोष्टीमुळे तो चांगलाच घाबरलेला दिसला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. रोहित हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 


हवेत उडणाऱ्या गोष्टीला पाहून घाबरला Rohit Sharma


न्यूझीलंडची टीम फलंदाजी करत असताना चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलनंकप रोहित ऑन फील्ड अंपायर नितिन मेननशी बोलताना दिसले. रोहितला अचानक आकाशात उडताना एक गोष्ट दिसली, ज्यामुळे तो फारच घाबरला. केवळ रोहित शर्माच नाही तर ड्रेसिंग रूममध्ये बसलेले राहुल द्रविड देखील या गोष्टीला घाबरले.


दरम्यान ही गोष्ट दुसरी तिसरी काही नाही तर आकाशातील बॉल होता. आकाशातून अचानक बॉल आपल्याकडे येत असल्याचं समजताच रोहित शर्मा घाबरला. मात्र त्यानंतर तो बॉल पकडण्यासाठी धावत गेला.



टॉस जिंकल्यानंतर 20 सेकंदांनी सांगितला निर्णय 


रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. जर भारताने हा सामना जिंकला तर सिरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेईल. मात्र सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूप कन्फ्यूज दिसला.


टॉसदरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणं उडवलं, यावेळी  टॉम लेथम ने हेडचा कॉल दिला आणि टेल आल्याने तो टॉस हरला. अशावेळी टॉस जिंकल्याने रोहित शर्माला प्रथम निर्णय विचारण्यात आला होती. मात्र यावेळी त्याने निर्णय सांगण्यासाठी तब्बल 20 मिनिटं घेतली आणि आपला निर्णय घेतला. गोलंदाजीचा निर्णय सांगण्यासाठी रोहितने इतका वेळ घेतला की टॉम आणि तिथे उपस्थित रवी शास्त्री जोरजोरात हसत होते.