मुंबई : केन विलियम्सनच्या सनरायझर्स हैदराबाकडून हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्यांदाच पराभवाची चव चाखली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 8 विकेट्सने पराभव झाला. या सामन्यात हार्दिक पांड्या मात्र विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात हार्दिक पांड्या आपल्याच टीममधील सहकारी आणि अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर चांगलाच संतापलेला दिसला. लाइव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्याने मोहम्मद शमीला कॅच न घेतल्याबद्दल चांगलंच खडसावलं असल्याचं कॅमेरात कैद झालंय. यावरून आता सोशल मीडियावर हार्दिक पंड्यावर टीका करण्यात येतेय. 


सोशल मीडियावर एका यूजरने लिहिलंय की, "हार्दिक पांड्याने वरिष्ठ खेळाडू आणि भारतीय दिग्गज मोहम्मद शमीचा अपमान केला यावर विश्वास बसत नाही. शमीने कॅच न घेता चौकार वाचवणं पसंत केलं. अशा कठीण प्रसंगात हार्दिकचा राग चाहत्यांच्या समोर येत आहे."




तर अजून एका यूजरने लिहिले की, 'हार्दिक पांड्या कोणत्याही टीमचा कर्णधार होण्याच्या लायकीचा नाही. ज्याला टीममधील खेळाडूंशी कसं बोलावं हे माहित नाही. क्रिकेट हा जेंटलमन गेम आहे.




एका युझरच्या म्हणण्याप्रमाणे, "सामना जिंकला नाही तर हार्दिक पंड्या टीमला जिवंत जाळेल असं दिसतंय.' हार्दिकने अशा पद्धतीने मोहम्मद शमीवर वैतागणं, चाहत्यांना आवडलेलं नाही. यामुळे पंड्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.