नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग टि्वटरवर खूप अॅक्टिव्ह असतो. आजही त्याने ट्विटरवरून हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मात्र नेमका 'हिंदी' शब्द लिहिताना त्याने चूक केली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने ट्विट करताना लिहिलं की, 'हिन्दि हमारे राष्ट्र की अभिव्यक्ति का सरलतम स्त्रोत हैं! जो बात हिंदी में है वो किसी और में नही! १७ सप्टेंबर को हिंदी कमेंट्री!#HindiDiwas' खरंतर त्याला हिंदी भाषेचा अभिमान आहे, याच आपण कौतुक करायला हवं. पण त्याने 'हिन्दि' आणि 'स्त्रोत' हे दोन शब्द लिहिताना चूक केली. बरोबर शब्द 'हिंदी' आणि 'स्रोत' असे आहेत. अर्थातच त्याने पुढच्या ओळीत आपली ही चूक सुधारली. पण एक खास गोस्ट म्हणजे सेहवागने हे ट्विट डिलीट न करता स्वतःलाच रिप्लाय करत योग्य शब्द लिहिला.