सेहवागचे मजेशीर ट्वीट, `व्हॉट ए सन`
भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची मैदानातील फटकेबाजी जरी त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत नसली तरी त्याची ट्विटरवर फटकेबाजी सुरुच असते.
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची मैदानातील फटकेबाजी जरी त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत नसली तरी त्याची ट्विटरवर फटकेबाजी सुरुच असते.
एखाद्याला ट्रोल करणे अथवा मजेशीर ट्वीट करण्यात वीरु मागे नसतो. त्याच्या ट्विटरवरील खास शैलीमुळेच तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
सेहवाग नेहमीच इतर क्रिकेटपटूंना त्यांच्या वाढदिवशी हटके ट्वीट करुन शुभेच्छा दितो. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर शेन वॉटसनलाही त्याने अशाच हटके अंदाजात शुभेच्छा दिल्यात.