नवी दिल्ली : एकेकाळी आपल्या विस्फोटक बॅटिंगने भारताला विजय मिळवून देणारा सेहवाग आता कौतुकास्पद काम करत आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या मुलांना सेहवाग क्रिकेट शिकवत आहे. क्रिकेट शिकवत असलेल्या दोन मुलांचा फोटो सेहवागने सोशल मीडियावर शेयर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवाग झज्जरमध्ये 'सेहवाग इंटरनॅशनल स्कूल' चालवतो. सेहवागची ही शाळा एक क्रिकेट अकादमीही आहे. सेहवागच्या या शाळेत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची मुलं शिकत आहेत. अर्पित सिंह आणि राहुल सोरेंग अशी या मुलांची नावं आहेत. अर्पित सिंहचे वडिल शहीद राम वकील आणि राहुल सोरेंगचे वडिल विजय सोरेंग १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झाले होते.



पुलवामा हल्ल्यानंतर शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण करु, अशी घोषणा सेहवागने केली होती. यानंतर आता सेहवागने या दोन मुलांचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोमध्ये अर्पित सिंह बॅटिंग आणि राहुल सोरेंग बॉलिंग करताना दिसत आहेत.


'हिरोंची मुलं. सेहवाग स्कूलमध्ये या दोन्ही मुलांना शिकवणं आमच्यासाठी सौभाग्य आहे. या मुलांसाठी थोडंसं योगदान देणं हे आमचं नशीब आहे. यापेक्षा जास्त आनंदाच्या गोष्टी फारच कमी असतील,' असं ट्विट सेहवागने केलं आहे.