नवी दिल्ली : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विलियम्सनं अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पंचांशी वाद घातला. पहिला सेट २-६नं गमावल्यानंतर सेरेनानं चेअर पंच कार्लोस रामोस यांच्याशी वाद घातला. सेरेनाशी सामन्यादरम्यान तिच्या प्रशिक्षकांशी इशाऱ्याद्वारे संवाद साधला. हे नियमांचं उल्लंघन असल्यानं पंच कार्लोस यांनी सेरेनाला इशारा दिला.. रॅकेटनं फाऊल केल्याप्रकरणी जेव्हा सेरेनाला दुसऱ्यांदा इशारा दिला.


सेरेना भडकली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तेव्हा सेरेना भडकली आणि तिनं रडत रडत पंचाला चोर म्हणतं पंचांनाच माफी मागायला सांगितलं. याखेरीज तुम्ही माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह कसं  काय उपस्थित करु शकता ? असा सवाल करत आपण आपल्या आयुष्यात कधीही फसवणूक केली नाही, असं म्हटलं. याशिवाय तुम्ही पुन्हा कोर्टवर येऊ शकणार नाहीत तुम्ही खोटारडे आहेत असंही सेरेना म्हणाली. 


अजून एक गेम पेनल्टी 


यामुळे नाराज झालेल्या पंचानं सेरेनाला अपशब्द वापरून नियामंचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजून एक गेम पेनल्टी दिली. सेरेनानं यापूर्वी काही वेळा पंचाशी वाद घातला होता. यामुळे एवढ्या मोठ्या खेळाडूला अशाप्रकारची वागणूक शोभत नसल्याची चर्चा आहे.