मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरूख खाननं पाकिस्तानच्या खेळाडूला किस्स केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर पाकिस्तानचा खेळाडू आणि शाहरूख खान दोघंही चर्चात होते. पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तर भारतात खूप लोकप्रिय आहे. भारतातही त्याचे बरेच चाहते आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाइट रायडर्सची ओळख खरं तर शोएब अख्तरमुळे झाल्याची चर्चा आहे. शोएब जेव्हा केकेआरकडून खेळायचा तेव्हा त्याची बॉलिंग आणि संघातील कामगिरी पाहून शाहरूख खान खूप खूश व्हायचा आणि त्याला किस्स करायचा. एकदा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला कार्यक्रमादरम्यान याबबत प्रश्न विचारला होता त्यावर शोएबनं हजरजबाबीपणाने उत्तर दिलं. 


अख्तरच्या म्हणण्यानुसार, 'शाहरूख खानला किस्स करायला आवडायचं. मी एक दिवस त्याला विचारलं की तुम्हाला हे असं करायला का आवडतं? ते माझे फॅन आहेत. ते जेव्हा मला किस्स करतात तेव्हा मी त्यांचा कायमचा फॅन होऊन जातो असंही शाहरूख यांनी मला उत्तर दिलं.'  



शोएब अख्तरच्या म्हणण्यानुसार शाहरूख खान किस्स करून कायम फॅनला आपलंस करतात. आयपीएल खेळत असताना शोएबला गँगस्टर सिनेमाची देखील ऑफर आली होती असंही त्याने सांगितलं आहे. त्याने 2008 मध्ये तीन सामने खेळले आणि त्यातही 5 विकेट्स घेतल्या होत्या. शोएबने करियरमध्ये 46 कसोटी सामने खेळून 178 विकेट्स घेतल्या आहेत. 163 वन डे सामने खेळून 247 विकेट्स घेतल्या आहेत.