शाहीन शाहने पहिल्याच ओव्हरमध्ये केल्या दांड्या गुल, इंग्लंड कोमात!
इंग्लंडला धक्क्यावर धक्के, पाकिस्तानचा भेदक मारा
eng vs pak Final : टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा थरार चालू आहे. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पाकिस्तानने दिलेल्या 138 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर हॅरिसने फिल साल्ट1 धाव आणि बटलरला 26 धावा बाद करत धक्के दिले आहेत. इंग्लंडचे तीन गडी बाद झाले असून आता हॅरी ब्रूक आणि बेन स्टोक्स 1धावा हे दोन अनुभवी फलंदाज मैदानात आहेत.
पाकिस्तानचा स्ट्राईक बॉलर शाहीनशाह आफ्रीदीने आपल्या पहिल्या षटकात खतरनाक हेल्सला माघारी पाठवलं आहे. हेल्सला काही समजण्याच्या आतच शाहीन शाहने त्याच्या दांड्या गुल केल्या. 1 धावेवर त्याला तंबूचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. पाकिस्तानची बॉलिंग नेहमी मजबुत पक्ष राहिला आहे.
पाकिस्तानचा संघ 138 धावांच्या लक्ष्यापासून रोखण्यात यशस्वी ठरतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. षटकार खेचणारा मोहम्मद रिझवान लवकर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद हॅरिस देखील 8 धावा करत बाद झाला. त्यानंतर कॅप्टन बाबरने जबाबदारी घेतली. त्याला मसूदने देखील मोलाची साथ दिली.
मात्र, आदिल रशिदने कॅप्टन बाबरला तंबूत पाठवलं आणि पाकिस्तानच्या आशा मावळल्या. त्यानंतर बटलरने पेस बॉलरला आणलं आणि पाकिस्तानची टीम पत्त्यासारखी कोसळली आणि पाकिस्तानने 137 धावा केल्या.