WATCH: शाहीन आफ्रिदीने केल्या बटलरच्या दांड्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video
Shaheen Afridi Viral Video: सध्या शाहीनच्या एका बॉलची जोरदार चर्चा होताना दिसते. त्याचा व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसतंय. अफ्रिदीने नेमकी काय कमाल केली पाहुया...
Shaheen Afridi, Jos Buttler: सध्या इंग्लंडमध्ये T20 ब्लास्ट लीगचा धुमधडाका पहायला मिळतोय. लीग आता रंगतदार स्थितीत आल्याचं पहायला मिळतंय. अशातच या स्पर्धेत पाकिस्तानचा खेळाडू शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) धुमाकुळ घातला आहे. T20 ब्लास्टच्या नॉटिंगहॅमशायर संघात शाहीन आफ्रिदी खेळतोय 4 जून रोजी नॉटिंगहॅमशायर विरुध्द लँकेशायरच्या सामन्यात (Nottinghamshire vs Lancashire T20 Blast) शाहीन आफ्रिदीने दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने 3 ओवरमध्ये 25 धावा दिल्या आणि 2 विकेट्स नावावर केल्या आहेत. मात्र, सध्या शाहीनच्या एका बॉलची जोरदार चर्चा होताना दिसते. त्याचा व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसतंय. अफ्रिदीने नेमकी काय कमाल केली पाहुया...
शाहीन आफ्रिदीची घातक गोलंदाजी
शाहीन आफ्रिदीने चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर धोकादायक यॉर्कर टाकला. त्यावेळी टी-ट्वेंटीचा स्टार बॅटर जॉस बटलर क्रिजवर होता. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जॉस बटलर (Jos Buttler) चांगली फलंदाजी करत होता. 15 चेंडूत 23 धावा करत त्याने गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पाळवलं. यामध्ये त्याने 3 चौकार देखील खेचले. त्याचवेळी शाहीन आफ्रिदीने आपलं रॉकेट यॉर्कर लाँच केलं आणि बटलरच्या दांड्या गुल केल्या. जॉस बटलरला शाहीन आफ्रिदीचा यॉर्कर महागात पडला, हा यॉर्कर एवढा घातक होता की जॉसच्या दोन्ही पायांच्या मधोमध पडला अन् बटलरची विकेट पडली. बॉलचा वेग एवढा जोरदार होता की बटलरला देखील तो चेंडू थांबवू शकला नाही. बॅाल जाऊन थेट स्टंप्सवर आदळला आणि उजव्या बाजूची विकेट उडाली.
बटलरची विकेट उडाल्यानंतर शाहिन अफ्रिदीने आपल्याच अंदाजात दोन्ही हात उंचावत सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पाहा Video
T20 ब्लास्ट लीग आहे तरी काय?
T20 ब्लास्ट लीग ही इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डद्वारे 2003 मध्ये स्थापन करण्यात आली. ही एक व्यावसायिक T20 क्रिकेट स्पर्धा आहे. व्यावसायिक प्रायोजकत्वामुळे ही स्पर्धा विविध नावांनी ओळखली जाते. 2003 ते 2009 पर्यंत Twenty20 Cup, 2010 ते 2013 पर्यंत Friends Provident t20 आणि Friends Life t20 आणि 2014 ते 2017 पर्यंत Natwest t20 Blast म्हणून ओळखले जात होतं. ही स्पर्धा 2018 पासून विमा कंपनी Vitality ने प्रायोजित केली आहे आणि ती Vitality Blast म्हणून ओळखली जाते.