पाकिस्तानने मन जिंकलं राव..! शाहीनने `चिमुकल्या बुमराह`साठी पाठवलं खास गिफ्ट; पाहा Video
PAK vs IND Viral Video : बुमराह भाई आणि भाभी यांचे खूप खूप अभिनंदन, देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणताना दिसतोय.
Shaheen Afridi delivers gift to Jasprit Bumrah : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) म्हटलं की कोणाच्याही अंगावर उत्साह संचारल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही देश एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी, त्यामुळे भारत-पाक सामना आला की सर्वांची उत्सुकता सातव्या आसमानावर पोहोचले. दोन्ही देशात आत्तापर्यंत अनेक टफ फाईट पहायला मिळाल्या आहेत. तर भांडणं तर विचारायलाच नको. आजवरच्या इतिहासात अनेक मैदानी भांडणं पहायला मिळाली आहेत. मात्र, आता भारत आणि पाकिस्तानमध्ये नुसतं प्रेम पहायला मिळतंय. बाबर आझम आणि विराट कोहली यांच्याकडे टीमची धुरा आल्यानंतर दोन्ही संघातील वातावरण बदलल्याचं पहायला मिळतंय. याचाच प्रत्यय देणारी एक घटना आज मैदानात पहायला मिळाली.
पाकिस्तान आणि भारत (PAK vs IND) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात पावसाने खोडा केला अन् सामना आता रिझर्व्ह डे ला खेळवला जाणार आहे. त्यामुळे आज सामना थांबल्याचं घोषित करण्यात आलं. सामना थांबवल्याचं समोर येताच पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) हातात काहीतरी घेऊन भारताच्या ड्रेसिंग रूमकडे जाऊ लागला. तेव्हा त्याने बुमराहची (Jasprit Bumrah) भेट घेतली अन् त्याला बाप झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.
बुमराह भाई आणि भाभी तुमचं खूप खूप अभिनंदन, देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो, असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणताना दिसतोय. त्यावर बुमराहने शाहीनचं गिफ्ट स्विकारलं अन् त्याला मनापासून धन्यवाद दिलं. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहण्याजोगी होती. भारत आणि पाकिस्तानमधील हा प्रेमांकूर फुटलेला व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय.
पाहा Video
दरम्यान, जसप्रीत बुमराह 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर आशिया कपच्या मध्यावर मुंबईला परतला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आपण बाप झाल्याचं त्याने जाहीर केलं अन् टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी बुमराह पुन्हा श्रीलंकेला परतला आहे.