नवी दिल्ली : शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या पुनरागमनाचं स्वागत केलं आहे. पीसीबीने पुढील महिन्यात वर्ल्ड इलेव्हन विरूद्ध तीन टी-२० सामन्यांच्या सीरीजचं आयोजन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा वर्ल्ड इलेव्हन टीमचं नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीस याच्याकडे देण्यात आली आहे. हे तीन सामने लाहोरमध्ये १२, १३ आणि १५ सप्टेंबरला खेळले जाणार आहेत. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनाची आफ्रिदीने स्वागत तर केलच पण, एका गोष्टीचं दु:खंही व्यक्त केलं. वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये एकही भारतीय खेळाडू नसल्याची खंत आफ्रिदीने व्यक्त केली. 


आफ्रिदीने टीम इंडियातील एकही खेळाडू वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये नसल्याने निराशा व्यक्त केली. भारतीय खेळाडूंना पाकिस्तान विरोधात केवळ आयसीसी टूर्नामेंट वर्ल्डकप, वर्ल्ड टी-२० आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची परवानगी आहे. आफ्रिदीने ट्विटरवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीच्या या संयुक्त स्पर्धेचं कौतुक केलं आहे. 


आफ्रिदीने ट्विटरवर लिहिले की, ‘या गोष्टीचा आनंद झाला की, ‘क्रिकेटला पाकिस्तानात परत आणण्यासाठी पीसीबी आणि आयसीसी यांनी हात मिळवला. जर भारतीय खेळाडूही आले असते तर अधिक चांगले वाटले असते’.


पाकिस्तान टीम : सरफराज अहमद (कप्तान), फखर जमान, अहमद शहजाद, बाबर आजम, शोएब मलिक, उमर अमिन, इमाद वसीम, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, अमीर यमीन, मोहम्मद आमिर, रुमन रईस, उस्मान खान, सोहेल खान. 


प्लेसीस वर्ल्ड इलेव्हन टीममध्ये ५ दक्षिण आफ्रिकी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यासोबत जॉर्ज बेली आणि टिम पेन हे दोन ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही आहेत. डेरेन सॅमी आणि सॅम्युअल बद्री हे वेस्टइंडिजचे खेळाडू आहेत. तर इंग्लंडचे पॉल कॉलिंगवुड आणि बेन कटिंग, बांगलादेशचा तमीम इकबाल, न्यूझीलंडचा ग्रांट इलियट आण श्रीलंकेचा थिसारा परेरा या खेळाडूंचा समावेश आहे.