Shahid Afridi चा खुलासा, भारतीय खेळाडूंना घरी जेवणासाठी बोलवले तेव्हा झाली होती चूक
भारतीय खेळाडूंना शाहीद आफ्रीदीने आपल्या घरी खास जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्याने आपल्याकडून एक चूक झाल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारतीय खेळाडू यांच्यातील नाते आज चांगले नसले तरी एक काळ असा होता जेव्हा ते एकमेकांचे मित्र होते. 2006 मध्ये जेव्हा भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तेव्हा शाहीद आफ्रिदीने संपूर्ण टीमला त्याच्या कराची मधील घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. डिनर पार्टीमध्ये चिकन-मटण होतेय पण ते पाहून अनेक जण अस्वस्थ झाले. कारण अनेक भारतीय खेळाडू नॉनव्हेज खात नव्हते.
भारतीय संघातील अनेक खेळाडू शाकाहारी होते. त्यामुळे ही गोष्ट कळताच आफ्रिदीने लगेचच डाळ आणि भाजी बनवली. अनेक वर्षांनंतर आफ्रिदीने हा किस्सा आठवला की, 'पाहुण्यांच्या खाण्याच्या सवयी न कळणे हे यजमान म्हणून माझ्यासाठी लाजिरवाणे होते.' असं म्हटलं होतं.
आशिया चषकाचा दुसरा सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना जगातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. यूएई चौथ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. फायनल 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत दुसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न करेल. 2016 आणि 2018 मध्ये यापूर्वीचे दोन्ही आशिया चषक भारताने जिंकले होते. 1988, 1990/91 आणि 1995 मध्ये सलग चॅम्पियन ठरला आहे.
पाकिस्तानचा सध्याची टी-20 टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आशियाई संघात दुसऱ्या क्रमांकावर तर जगात ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुबई आणि शारजाहमध्येही पाकिस्तान संघाने भरपूर क्रिकेट खेळली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणं अपेक्षित आहे.