मुंबई : भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटचे दोन मोठे प्रतिस्पर्धी मानले जातात. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये खेळलेले सामने बहुतेक अविस्मरणीय राहिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांच्यामध्ये चेतन शर्माच्या चेंडूवर जावेद मियांदादचे सिक्स, वीरेंद्र सेहवागचे मुल्तानमधील तिहेरी शतक, आकीब जावेदची हॅटट्रिक, चेन्नई कसोटीत सचिन तेंडुलकरचं संघर्षपूर्ण शतक, पहिल्यांदा दोन देशांदरम्यान खेळलेले टी-20 वर्ल्ड कप फायनल सारखे बरेच क्षण प्रेक्षकांच्या मनात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना होणार आहे.


टी-20 वर्ल्डकपमध्ये हा सामना होणार असून कोण बाजी मारणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. तर यावर पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफरिदी याने कोण जिंकणार यावर त्याचं मत व्यक्त केलं आहे.


शाहिद आफ्रिदी म्हणतो, "भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच हाय व्होल्टेज सामने असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्याच प्रेशर मॅच आहेत, जो संघ प्रेशर चांगल्या प्रकारे मॅनेज करतो तो जिंकेल. त्याशिवाय कमीत कमी चुका करणा -या टीमला जिंकण्याची अधिक शक्यता असते."


विश्वचषक सामन्यांमध्ये भारत 12-0 ने आघाडीवर


भारत आणि पाकिस्तान यांच्यात 50 ओव्हर्स आणि 20 ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. 50 ओव्हर्सच्या सामन्यांमध्ये भारत 7-0 ने आघाडीवर आहे, तर टी -20 सामन्यांमध्ये टीम इंडियाची 5-0 आघाडी कायम आहे.