नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदिने आपली ऑल टाईम बेस्ट क्रिकेट टीम निवडली आहे. या टीममध्ये जगभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश केला असून भारताकडून केवळ एका खेळाडूला टीममध्ये निवडलं आहे.


आफ्रिदीच्या टीममध्ये हा खेळाडू ओपनर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आणि त्यावेळचा त्याचा साथीदार सईद अनवरला आपल्या टीममध्ये सलामीचा फलंदाज म्हणून निवडलं आहे. तर सईद अनवरच्या जोडीला ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज अॅडल गिलख्रिस्टला पसंती दिली आहे.


भारताच्या एकमेव खेळाडूचं नाव


आफ्रिदीने निवडलेल्या Playing XI मध्ये केवळ एका भारतीय खेळाडूचं नाव आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू या टीममध्ये आहे. सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आफ्रिदीने पसंती दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि फलंदाज रिकी पॉन्टिंगची निवड केली आहे. 


Playing XI चा कर्णधार 


आफ्रिदीने निवडलेल्या Playing XI मध्ये इंजमाम उल हकला कर्णधार बनवलं आहे.  पाचव्या क्रमाकांवर त्याला फलंदाजीसाठी पसंती दिली आहे. याशिवाय वसीम अक्रम, शोएब अख्तर या वेगवान गोलंदाजांना टीममध्ये निवडलं आहे.  ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल. आफ्रिदीच्या टीममध्ये 5 पाकिस्तानी, 4 ऑस्ट्रेलियन तर दक्षिण आफ्रिका आणि भारताच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली आहे. 


शाहिद आफ्रिदीची ऑल टाइम Playing XI


सईद अनवर, अॅडम गिलक्रिस्ट, रिकी पॉंटिंग, सचिन तेंडुलकर, इंजमाम उल हक, जॅक कॅलिस, राशिद लतीफ (विकेटकीपर), वसीम अक्रम, शेन वॉर्न, ग्लेन मैक्ग्रा आणि शोएब अख्तर