शाहिद आफ्रिदीच्या घरात शोककळा! जिच्यासाठी केले होते दुआ करण्याचे आवाहन, ती वाचू शकली नाही
Shahid Afridi Sister passes away : पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे निधन झाले आहे. आफ्रिदीची बहीण बऱ्याच दिवसांपासून आजारी होती.
Shahid Afridi News : पाकिस्तानचा संघ सध्या भारतात वर्ल्ड कप (ICC ODI World Cup 2023) खेळत आहे. अशातच आता पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू म्हणजेच शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे (Shahid Afridi Sister passes away) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आफ्रिदीची बहीण बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. बहिणीसाठी आफ्रिदीने चाहत्यांकडे दुआ करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, ना दुवा ना दवा कामाला आली.
काय म्हणाला Shahid Afridi ?
निःसंशय आपण अल्लाहचे आहोत आणि आम्ही त्याच्याकडे परत जाऊ...जड अंतःकरणानं आम्ही तुम्हाला कळवत आहोत की आमच्या प्रिय बहिणीचं निधन झालं आहे, असं म्हणत शाहिद अफ्रिदीला भावना अनावर झाल्या. काही तासापूर्वी शाहिद आफ्रिदीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून बहिणीसाठी दुआ करण्याची विनंती केली होती.
मी लवकरच तुला भेटण्यासाठी परत येत आहे, माझे प्रेम कायम राहो. माझी बहीण सध्या तिच्या आयुष्यासाठी लढत आहे, मी तुम्हाला विनंती करतो की तिच्या आरोग्यासाठी दुआ करा. अल्लाह तुला लवकर बरे करो आणि उदंड निरोगी आयुष्य देवो, असं शाहिद आफ्रिदीने म्हटलं होतं. मात्र, आता आफ्रिदीच्या बहिणीच्या निधनाची बातमी आफ्रिदीने दिली आहे.
दरम्यान, शाहिद आफ्रिदीला 11 भावंडे आहेत, ज्यात 6 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. शाहिद आफ्रिदी घरात पाचव्या क्रमांकावर आहे. शाहिद आफ्रिदीला पाच मुलं आहेत. नुकतंच त्याने आपल्या मोठ्या मुलीचं लग्न शाहीन शाह आफ्रिदीसोबत लावून दिलं होतं.