शाहिद आफ्रिदीनं चारचौघात काढली जायवाची इज्जत, म्हणतो, `त्याला चुकून कॅप्टन केलं, खरा कर्णधार...`
Shahid Afridi Statement : पाकिस्तानसाठी (Pakistan Cricket Team) रिझवान मेहनत घेतोय, पण चुकून शाहीन कर्णधार झाला, असं शाहिद आफ्रिदीने म्हणाला आहे.
Pakistan Cricket Team : वनडे वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल झाल्याचं पहायला मिळालं. बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला अन् पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर शान मसूदला टेस्ट संघाची तर शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याला टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी देण्यात आली. अशातच आता पाकिस्तान शाहीनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशातच या सीरिजआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi Statement) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाला Shahid Afridi ?
मी रिझवानच्या मेहनतीची आणि फोकस लेव्हलची प्रशंसा करतो. त्याची सर्वोत्तम गुणवत्ता मला सर्वात जास्त आवडते. ती म्हणजे फक्त त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करणं. कोण काय करतंय आणि काय करत नाही याकडे लक्ष देऊ नका. तो खरोखर एक लढाऊ आहे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. मला त्याला टी-२० कर्णधार म्हणून पाहायचे आहे, पण चुकून शाहीन कर्णधार झाला, असं शाहिद आफ्रिदीने म्हणाला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचा संघ -
शाहीन आफ्रिदी (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान, सईम अयुब, साहिबजादा फरहान, हसिबुल्ला खान, इफ्तिखार अहमद, आझम खान, आमेर जमाल, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, मोहम्मद नवाज, अबरार अहमद, उसामा मीर, हरिस रौफ, जमान खान.
T-20 सामन्याचं वेळापत्रक
12 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (ऑकलंड)
14 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - (हॅमिल्टन)
17 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - (ड्युनेडिन)
19 जानेवारी: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - (क्राइस्टचर्च)
12 जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - (क्राइस्टचर्च)