मुंबई : देशभरात आज ७०व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींसह टीम इंडियाच्या क्रिकेटर्सनंही देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्यासोबतच पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं देखील भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा या ट्विटमुळे त्याचंही अभिनंदन केलं जात आहे. 



भारताच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देण्यासाठी आफ्रिदीनं एक खास ट्वीट केलं असून या ट्वीटमध्ये त्याने एक संदेशही दिला आहे. तो म्हणाला आहे की, ‘भारताला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा! आपण शेजारी आहोत हे बदलणार नाही, चला आपण शांतता, सहिष्णुता आणि प्रेम यासाठी काम करुयात आणि मानवतेला आणखी मजबूत करु.’


याआधी अनेकदा शाहिद आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तानच्या मैत्रीबाबत आपलं मत बिनधास्तपणे व्यक्त केलं आहे. दरम्यान, नुकतंच कर्णधार विराट कोहलीनं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला आपली बॅट देऊ केली होती.