`डूबा हुआ अभी है तेरे बाबा का दिल...`; लेकीला सासरी पाठवताना शाहीद आफ्रिदी भावूक
Viral News : लेकीला सासरी पाठवताना वडिलाचं मन हळहळतं. शाहीद आफ्रिदीसुद्धा इथं अपवाद ठरला नाही. पाहा मुलीसाठी त्यानं काय लिहिलंय...
Viral News : तिथं आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ही स्पर्धा अंतिम टप्प्यावरही पोहोचली नव्हती तोच पाकिस्तानच्या संघातील एका खेळाडूच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातही हा खेळाडू दुसऱ्यांचा लग्न करत असल्यामुळं त्याच्या अवतीभोवती अनेक चर्चाही प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळालं. हा खेळाडू म्हणजे शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi marriage). आता तुम्ही म्हणाल यंदाच्याच वर्षी काही महिन्यांपूर्वी शाहीनचा निकाह झाला होता. आता तो पुन्हा लग्न करतोय?
तर मुळात शाहीन दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या ज्या चर्चा होत्या त्याच उथळ होत्या. कारण, शाहीननं शाहीद आफ्रिदीची मोठी मुलगी अनशा आफ्रिदीशीच पुन्हा निकाह केला आहे. पहिल्या विवाहसोहळ्यावेळी फक्त कुटुंबीय आणि जवळच्याच मंडळींची हजेरी होती. त्यामुळं यावेळच्या विवाहसोहळ्याचा बऱ्याच पाहुण्यामंडळीची हजेरी पाहायला मिळाली.
बुधवारीच पाकिस्तानाच हा विवाहसोहळा आणि Reception पार पडलं. लेक आता खऱ्या अर्थानं आपल्यापासून दूर जाणार याच भावनेनं या क्षणी शाहीद आफ्रिदी प्रचंड भावूक झाला होता. चेहऱ्यावर आनंद, हास्य ठेवत तो पाहुण्यांना भेटत होता खरा. पण, त्याच्या मनातली कालवाकालव मात्र अखेर बाहेर आलीच.
हेसुद्धा वाचा : मिठी, एकत्र जेवण अन्... लग्न सोहळ्यातच शाहीन आफ्रिदी-बाबर आझमचा Bromance! पाहा Videos
शब्दांचा आधार घेत त्यानं लेकिला निरोप दिला आणि इथं मैदानावर आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या शाहीद आफ्रिदीची हळवी बाजू सर्वांसमोर आली. सोशल मीडियावर त्यानं निकाहदरम्यानचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं,
'आया था घर में नूर अभी कल की बात है
रुक़सत भी हो रहा है वो आंखों के सामने
डूबा हुआ अभी है तेरे बाबा दिल मगर
उम्मीद सुबह नौ आयी है इसे थामने'
लेकीसोबत आफ्रिदीचं खास नातं...
अनशासोबत शाहीद आफ्रिदीचं एक खास नातं कायमच पाहायला मिळालं आहे. आफ्रिदीसोबत अनेक ठिकाणी तिला पाहिलं गेलं आहे. क्रिकेट वर्तुळासाठीसुग्धा अनशा नवी नाही. अशी ही जिवाभावाची आणि हक्काची मैत्रीण, आपली लेक आता दुसऱ्याच्या घरी जाणार याच भावनेनं आफ्रिदी हळहळला आणि त्यानं जड मनानं तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानं उर्दू भाषेत लिहिलेल्या ओळी तुमच्याही मनाला भावतील.