भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी `या` स्टार खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती
Shakib Ul Hasan Retirement : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे शुक्रवार 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.
Shakib Al Hasan Retirement : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. शुक्रवार 27 सप्टेंबर पासून या सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसन याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत - बांगलादेश टेस्ट सीरिजपूर्वी कानपुर येथे पत्रकार परिषद पार पडली यात शाकिबने निवृत्तीची घोषणा केली आहे.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 5 दिवसांची टेस्ट सीरिज खेळवली जाईल. यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्या टीम कानपूरमध्ये पोहोचल्या आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही टीमची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शाकिब अल हसन याने तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. शाकिब अल हसन हा बांगलादेशचा ऑल राउंडर आणि माजी कर्णधार आहे.
हेही वाचा : IND VS BAN : मॅच दरम्यान कानपुर स्टेडियमवर होऊ शकतो अपघात, BCCI चं टेन्शन वाढलं
शाकिबने निवृत्तीची घोषणा करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशमध्ये होणारा टेस्ट सामना हा त्याचा शेवटचा असल्याचे सांगितले. मात्र बांगलादेशमधील परिस्थिती पाहता हा सामना होण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा ग्रीन पार्कवर भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना शाकिबचा शेवटचा ठरू शकतो.
बांगलादेशची टेस्ट टीम :
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, जाकेर अली, नईम हसन , खालेद अहमद, महमुदुल हसन जॉय