कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात बांगलादेशला भारताकडू जरी पराभव सहन करावा लागला असला तरी कर्णधार शाकीब अल हसन संघाच्या कामगिरीवर खुश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाकीब म्हणतो, संघाच्या कामगिरीने मी खुश आहे. संघाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. बांगलादेशने टॉस हरताना प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १६७ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर भारताच्या दिनेश कार्तिकने खेळलेल्या २९ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला. 


कर्णधार शाकीब सामन्यानंतर म्हणाला, शेवटच्या ओव्हरसाठी मी सरकारला काही खास सांगितले नव्हते. गोलंदाजाला इतकं जास्त समजावणे चांगले नाही. मी त्याला केवळ आरामात वेळ घेऊन खेळ असे सांगितले. कधी कधी तुम्ही गोलंदाजी करताना लय गमावता आणि नुकसान होते. त्याने आधीच्या तीन ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. 


तो पुढे म्हणाला, भारताविरुद्धच्या या पराभवासाठी मी कोणा एकाला जबाबदार ठरवू शकत नाही. आमच्या दोन ओव्हर खराब होत्या. मी कोणाला दोष देऊ शकत नाही. मला संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर गर्व आहे.