मुंबई : ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्न याचे शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. परंतु त्याच्या मृत्यूबाबत त्याच्या मॅनेजरने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या मेनेजरने सांगितले की, जेव्हा त्याला हार्ट अटॅक आला तेव्हा तो मित्रांसोबत रात्रीच्या जेवणापूर्वी क्रिकेट पाहत होता. त्यादरम्यान त्याच्यासोबत हा सगळा प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील एका अहवालात म्हटले आहे की, शेन वॉर्नला वाचवण्यासाठी जवळपास 20 मिनिटे सीपीआर देत होता. परंतु तरी देखील त्याला वाचवण्यात अपयश आलं.


52 वर्षीय माजी खेळाडूच्या मॅनेजरने हेराल्ड आणि द एजला सांगितले की, वॉर्नने आपला मित्र अँड्र्यूला भेटण्यासाठी मद्यपान केले नव्हते. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक पहिला कसोटी सामना टेलिव्हिजनवर पाहात होते, ज्यानंतर वॉर्न बेशुद्धावस्थेत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.


शेन वॉर्न कोह सामुई, थायलंड येथे सुट्टी घालवत होता आणि त्याचा कॅमेन्ट्री असाइनमेंटसाठी यूकेला जाणार होता. 


शेन वॉर्नचा मॅनेजर जेम्स यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्नने मद्यपान करणे बंद केले होते, कारण तो डाएटिंग करत होता. म्हणजे बऱ्याच काळापासून तो दारु प्यायलेला नाही. त्यामुळे दारुमुळे त्याच्या मृत्यू झाला असावा हे शक्य नाही. 


ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी क्रिकेटच्या शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहत म्हटला की, "महान डॉन ब्रॅडमनच्या असामान्य कामगिरीपर्यंत पोहोचू शकणाऱ्या मोजक्या लोकांपैकी वॉर्न एक होता."


पुढे मॉरिसन म्हणाला, परंतु ऑस्ट्रेलियन लोकांसाठी शेन त्याहून अधिक होता. शेन हा त्यांच्यासाठी देशातील महान पुरुषांपैकी एक होते. ऑस्ट्रेलियन लोकांनी त्याच्यावर प्रेम केले. जसे आपण सर्वांनी केले आहे.
शेन वॉर्नची क्रिकेट कारकिर्द 


शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. तर 194 वनडे मॅचमध्ये त्याने 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची वनडेमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.