T20 World Cup 2021: सेमीफायनलपर्यंत पोहोचणार या 4 टीम, दिग्गज स्पिनरची भविष्यवाणी
सेमीफायनलपर्यंत कोणत्या टीम पोहोचतील? तुम्हाला काय वाटतं?
दुबई: UAE मध्ये टी 20 वर्ल्ड कपचे सामने सुरू आहेत. यंदा अत्यंत चुरशीची लढत सुरू आहे. सुपर 12 मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघ सर्वात उत्तम टीम म्हणून जगात चर्चा आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात इंग्लंडने 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने देखील 3 पैकी तीन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
न्यूझीलंड विरुद्ध आज सामना होत आहे. हा सामना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया 3 पैकी प्रत्येक 2 सामने जिंकले आहेत. आता टीम इंडियाला आजचा सामना जिंकायचा आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नने सेमीफायनलमध्ये कोणत्या टीम पोहोचणार याची भविष्यवाणी केली आहे.
शेन वॉर्नने ट्वीट करून कोणत्या टीम सेमीफायनलला पोहोचतील हे सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नने ट्विट करून ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील प्रत्येकी दोन संघांची नावं सांगितली आहेत.
शेन वॉर्नच्या मते, ग्रुप 1 मधून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात. शेनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीत पाहायचे आहे.
सध्याच्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ पूर्ण फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला एकतर्फी 10 गडी राखून पराभूत करून इतिहास बदलला. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला. पाकिस्ताननेही अफगाणिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयाचा वेग पाहता ते अंतिम फेरीत पोहोचण्यास पात्र आहेत असं शेन वॉर्नचं मत आहे.
इंग्लंडने आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. इंग्लंडने तिन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. इंग्लंड संघ त्यांच्या गटात अव्वल आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव केला. यानंतर इंग्लंडने बांगलादेशचा पराभव केला. सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये टफ फाईट होऊ शकते असा शेन वॉर्नचा दावा आहे.