IND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO
पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात.
IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंडमधील (IND vs NZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (IND vs NZ 2nd T20) भारताने 65 धावांनी विजय मिळवला. भारताकडून सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 192 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचा खेळाडू 126 रन्सवर गारद झाले. या सामन्यात प्रथम टॉस जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इशान आणि पंत फलंदाजी उतरल्यावर पावसामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला होता.
पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2nd T20) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला गेला. टीम इंडिया पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरल्यानंतर अवघ्या 6 ओव्हरमध्ये पाऊस आला आणि काही काळ खेळ थांबवण्यात आला.
अशातच टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये होते आणि पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. याचवेळी एका दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ड्रेसिंग रूममध्ये एका ठिकाणी खेळाडू गप्पा मारत होते तर दुसरीकडे युझवेंद्र चहल मजेत सँडविच खात होता. यावेळी शार्दुल ठाकुर आणि सिराजही चहलजवळ पोहोचले आणि त्याच्या सँडविचवर तुटून पडले. चहलही प्रेमाने त्यांना सँडविच भरवताना कॅमेरात कैद झालाय.
टीम इंडियाचा विजय
टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला होता. भारताकडून सलामीस इशान किशन आणि ऋषभ पंत आले होते. मात्र पंत मोठी खेळी करू शकल नाही 6 धावांवर स्वस्तात परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि किशनने भागीदारी केली. इशान किशन 36 धावांवर बाद झाला, मात्र त्यानंतर भारताच्या विकेट्स पडत गेल्या.
न्यूझीलंड संघाचाही सुरूवात खराब झाली, पहिल्याच षटकामध्ये भुवनेश्वर कुमारने फिन अॅलेनला शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर कॉनवेला वॉशिंग्टनने 25 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. एकीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मैदानावर तग धरून राहिला होता. 52 चेंडूत केनने 61 धावांची खेळी केली मात्र सिराजने त्याला फुलटॉस बॉलवर बाद केलं.
केन गेल्यावर न्यूझीलंडच्या विकेट्स पडत गेल्या आणि 126 धावांवर पूर्ण संघ ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.