अंडर १९ आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, पृथ्वी शॉ बाहेर
अंडर १९ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केलीये. पुढील महिन्यात नऊ नोव्हेंबरपासून मलेशियामध्ये ही स्पर्धा सुरु होत असून २० नोव्हेंबरला संपणार आहे.
मुंबई : अंडर १९ आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने संघाची घोषणा केलीये. पुढील महिन्यात नऊ नोव्हेंबरपासून मलेशियामध्ये ही स्पर्धा सुरु होत असून २० नोव्हेंबरला संपणार आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हिमांशू राणाकडे सोपवण्यात आलेय. भारताने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवलेय. दरम्यान, या स्पर्धेत मुंबईकर पृथ्वी शॉला वगळण्यात आलंय.
निवड समितीनुसार, १७ वर्षीय पृथ्वी शॉला रणजी सामन्यांमध्ये खेळायला हवे. पृथ्वी शॉने दिलीप ट्रॉफीमध्येही शतक ठोकले होते.
भारतीय संघ - हिमांशू राणा(कर्णधार), अभिषेक वर्मा(उपकर्णधार), अर्थव तायडे, मनजोत कालरा, सलमान खान, अनुज रावत, हार्विक देसाई, रियान पराग, अनुकूल रॉय, शिवा सिंग, तनुष कोटियन, दर्शन नलकांडे, विवेकानंद तिवारी, आदित्य ठाकरे, मनदीप सिंग.