मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन याला विरोधी टीमच्या बॉलर्सची धुलाई करताना तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. विरोधी टीमच्या बॉलर्सचा शिखर धवन चांगलाच समाचार घेतो.


धडाकेबाज हाफ सेंच्युरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या शिखर धवन खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी झालेल्या बांगलादेश विरोधातल्या मॅचमध्ये धवनने धडाकेबाज हाफ सेंच्युरी केली. धवनने ४३ बॉल्समध्ये ५५ रन्स केले ज्यामध्ये ५ फोर आणि २ सिक्सरचा समावेश आहे. 


विराटने केलं चॅलेंज आणि शिखरने दिलं उत्तर


या सीरिजमधील शिखर धवनची ही दुसरी हाफ सेंच्युरी आहे तर टी-२० करिअरमधील सहावी हाफ सेंच्युरी आहे. यावेळी शिखरला कॅप्टन विराट कोहलीने एक चॅलेंज दिलं आणि शिखरने त्याचं आपल्या अंदाजात उत्तर दिलं.


विराट कोहलीने शिखरला एक चॅलेंज दिलं. या चॅलेंजचं नाव स्वॅगपॅक चॅलेंज असं आहे. या चॅलेंजनुसार विराट कोहलीने शिखर धवनला ट्विटरवर टॅग करत लिहीलं की, हा बघ माझं स्वॅगपॅक चॅलेंज, शिखर धवन तुला वाटतं की तु यापेक्षा चांगलं करु शकतो? जर करु शकतो तर माझं चॅलेंज स्विकार.



शिखर धवननेही विराटचं चॅलेंज स्विकारलं आणि आपला जलवा दाखवला. निडास ट्रॉफीसाठी श्रीलंकेला गेलेल्या शिखर धवनने तेथूनच कॅप्टनने दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं.



या स्वॅगपॅक चॅलेंजमध्ये पाठीवर टूरिस्ट बॅग घेवून डान्स मूव्स करायचं होतं. शुक्रवारी धवनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत त्याने कोहलीच्या स्वॅगपॅक चॅलेंजला पूर्ण केलं आहे.