पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाने बांगलादेशला (team india vs bangladesh) 5 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलमधील स्थान निश्चित मानलं जातंय. मात्र फक्त एक सामना जिंकून हे स्थान आणखीण भक्कम होणार आहे. त्यात आता या वर्ल्ड कपदरम्यान एक मोठा निर्णय़ झाला आहे. टीम मॅनेजमेंटने अचानक कॅप्टनच (Captaincy) बदलण्याचा निर्णय घेतला आहे. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे अचानक अस काय झालं की त्यांना कॅप्टन बदलावासा वाटला, हेच जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने बांगलादेशचा (team india vs bangladesh) पराभव करत गुणतालिकेत टॉपच स्थान गाठलंय. त्यामुळे सेमी फायनलमधील त्याचं स्थान निश्चित आहेत. त्यात आता दुसरी टीम सेमी फायनलमध्ये कोणती दाखल होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यात आता आजच्या टीम इंडियाच्या विजयाची चर्चा सुरू असताना टीम मॅनेजमेंटने (Team Management) धक्कादायक निर्णय़ घेतला आहे. टीम मॅनेजमेंटने कॅप्टनच बदलला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.   


'या' खेळाडूकडे सोपवली कॅप्टन्सी


टीम इंडियाचा (team india) सलामीवीर शिखर धवनचा (Shikhar dhawan) टी20 वर्ल्ड कपमध्ये समावेश करण्यात आला नाही. तो सध्या वर्ल्ड कपपासून दूर आहे. मात्र तो टीम इंडियात खेळताना दिसणार आहे. तसेच वर्ल्ड कप आधी तो टीम इंडियाचं कर्णधार पद भूषवताना दिसला होता. न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याला टीम इंडियाच कर्णधारपद देण्यात आलं होत. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. आता त्याला आणखीण एका संघाने कर्णधार पद बहाल केलं आहे. हा संघ आयपीएलमधला आहे. 


'या' खेळाडूला कॅप्टन्सीवरून हटवलं


इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आधी पंजाब किंग्सच्या (Punjab kings) संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मयंक अग्रवालच्या जागी शिखर धवनकडे (Shikhar dhawan) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. धवन हा अनुभवी खेळाडू असून अलीकडच्या काळात तो भारतीय संघाचे कर्णधार पद भूषवतानाही दिसला होता. तसेच धवनला मयंकपेक्षा अधिक कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि तो पंजाबसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.


गेल्या मोसमातच पंजाबने धवनला (Shikhar dhawan) कर्णधार करण्याचा मूड बनवला होता, मात्र अखेरच्या क्षणी निर्णय बदलून मयंकला कर्णधार बनवण्यात आले होते. गेल्या मोसमात मयंकच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी चांगली नव्हती. आता धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब नव्या मोसमात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.


आयपीएल कामगिरी


धवनने (Shikhar dhawan) 14 सामन्यांत 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या आणि तो पंजाबसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. धवनच्या बॅटमध्ये तीन अर्धशतकं झळकली होती आणि नाबाद 88 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. मयंकने 12 डावात 16.33 च्या खराब सरासरीने केवळ 196 धावा केल्या होत्या. मयंकच्या बॅटमधून केवळ एकच अर्धशतक होते.


दरम्यान धवनच्या (Shikhar dhawan) नेतृत्वाखाली पंजाब आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.