श्रीलंकेविरुद्ध शिखरचे शानदार शतक
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक साकारलेय. त्याने ७१ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि २ षटकारांसह दमदार शतकी खेळी साकारली.
दम्बुला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक साकारलेय. त्याने ७१ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि २ षटकारांसह दमदार शतकी खेळी साकारली.
श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात धवन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याआधी कसोटी मालिकेतही धवनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
धवनच्या शतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतक साजरे केलेय. त्याने ५० चेंडूत अर्धशतक साकारले. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २१६ धावा केल्या.