व्वा रे गब्बर! शिखर धवनची कोरोनाग्रस्तांसाठी मदत, पोलिसांनी मानले आभार
क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्ती, खेळाडू आणि संघटनांनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नुकसान आणि अनेक संकटांना लोक समोरं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कलाकार, क्रीडा विश्वातील अनेक खेळाडू आणि देश-विदेशातील मोठ्या संस्था मदतीसाठी हात पुढे करत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने भारतातील कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
शिखर धवनने रुग्णांसाठी अनेक ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन दान दिले आहेत. गुरुग्राम पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शिखर धवनचे आभार मानले आहेत.
आशा महासंकटाच्या काळात लोकांची सेवा करता त्यासाठी तुमचे आभार. या महासंकटात माझ्याकडून एक ही छोटीशी मदत आहे. भारत या महासंकटावर मात करून पुन्हा एकदा उज्ज्वल होईल अशी आशा व्यक्त केली.
18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीममध्ये शिखर धवनची निवड करण्यात आली नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन B टीमसोबत असणार आहे. संघाच्या कर्णधारपदाचं नेतृत्व शिखरच्या खांद्यावर दिलं जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात भारत विरुद्ध श्रीलंका 3 वन डे आणि 3 टी 20 सामन्यांची सीरिज होणार आहे.