शिखर धवननं तोडलं सचिन-सौरवचं हे रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ओपनर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं १९वं अर्धशतक केलं आहे.
लंडन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ओपनर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं त्याचं १९वं अर्धशतक केलं आहे. याचबरोबर या मॅचमध्ये धवननं सचिन आणि सौरव गांगुलीचं रेकॉर्ड तोडलं आहे.
आयसीसी टूर्नामेंट्समध्ये सर्वात जलद एक हजार रन्स बनवण्याचं रेकॉर्ड धवननं केलं आहे. आयसीसी टूर्नामेंट्समध्ये एक हजार रन बनवायला धवनला १६ इनिंग लागल्या. हेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरनं १८ इनिंगमध्ये आणि सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉनं २० इनिंगमध्ये केलं होतं.
याचबरोबर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त ५० रन्स बनवण्याच्या रेकॉर्डचीही धवननं बरोबरी केली आहे. धवननं आत्तापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं झळकवली आहेत. राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीनंही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा अर्धशतकं केली आहेत.