श्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा
श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे.
कोलंबो : श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे. या सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शिखर धवननं श्रीलंकेमध्ये रिक्षा चालवली आहे. शिखर धवन चालवत असलेल्या या रिक्षेमध्ये हार्दिक पांड्यानं प्रवास केला. रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ शिखर धवननं इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये पंजाबी गाणंही ऐकायला येतंय.
टेस्ट सीरिजमध्ये श्रीलंकेला हरवल्यानंतर आता २० ऑगस्टपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत पाच वनडे आणि एक टी-20 खेळणार आहे.