जडेजाच्या पायाची दुखापत, शिखर धवनचा भांगडा, पाहा VIDEO
रविंद्र जडेजाच्या दुखापतीवर असा का रिअॅक्ट झाला शिखर धवन? VIDEO पाहून तुम्हीच ठरवा
मुंबई : टीम इंडिया (Team India) संध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध (Australia) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळतेय. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती. दरम्यान टीम इंडियाचे काही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात व्यस्त आहेत, तर काही खेळाडू मैदानाबाहेर मजा-मस्ती करताना दिसत आहे. या संदर्भातलाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. नेमकं या व्हिडिओत काय घडलंय ते जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असतो. सोशल मीडियावर आपले हटके व्हिडिओ टाकून तो फॅन्सचे मनोरंजन करत असतो. आता असाच एक त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो जडेजाची खिल्ली उडवताना दिसत आहे.
व्हिडिओत काय?
शिखर धवनने (Shikhar Dhawan) शेअर केलेल्या व्हिडिओत दुखापतग्रस्त बॉलर रविंद्र जडेजा दिसत आहे. मैदानावर खेळताना पायावर दुखापत झाल्याने तो त्याच्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. यावेळी मेडीकल टीमचा सदस्य त्याची काळजी घेण्यासाठी उभा आहे. या दरम्यान शिखर धवनमध्येच येऊन भांगडा डान्स करतोय. यावेळी रविंद्र जडेजा त्याच्या या हरकतीवर, याचं लग्न लावून टाका, जबाबदारी येईल तर सुधरेल, अशी टीप्पनी करताना दिसत आहे. एकूणच काय तर धवनच्या या हरकतीवर जडेजा संतापलेला पाहायला मिळाला.
धवनने (Shikhar Dhawan) शेअर केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. फॅन्स या व्हिडिओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. तर सहकारी खेळाडू देखील हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट केल्याशिवाय स्वतःला थांबवू शकत नाहीत. धवन आणि जडेजाच्या या फनी व्हिडिओवर अर्शदीप सिंग, सूर्यकुमार यादव या क्रिकेटपटूंनी देखील कमेंट केली आहे.
दरम्यान शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरूद्घ (Australia) दुसरा टी 20 सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) मालिकेत बरोबरी केली. आता हैदराबादमध्ये रंगणारा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात जिंकणारी टीम मालिकेवर बाजी मारणार आहे.