Shikhar Dhawan : `...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण`, रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो `सलामीवीर म्हणून मी...`
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Shikhar Dhawan On Rohit Sharma : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawa) गेल्या दोन वर्षापासून संघापासून लांब आहे. चांगली खेळी करून देखील शिखरला बीसीसीआयने (BCCI) वारंवार डावल्याचं दिसून आलं होतं. अशातच बीसीसीआयच्या कोणत्याही नियोजनाचा भाग नसल्याचं शिखर धवनने स्पष्ट केलं होतं. अशातच आता शिखर सुट्टीचा आनंद घेत असल्याचं दिसतंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिखरने कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतूक केलंय. आयुष्यातील सर्वोत्तम क्षण कोणता? यावर देखील शिखरने वक्तव्य केलंय.
काय म्हणाला Shikhar Dhawan ?
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांननी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित असल्याचं म्हटलं आहे. 'जेव्हा मी आणि रोहित शर्मा दोघेही एकत्र ओपन करायचो तेव्हा दुसऱ्या टोकाला उभा असलेला रोहित दबाव कमी करायचा. आम्ही दोघे एकमेकांना समजून घेत होतो. रोहितसोबत सलामी करणे नेहमीच आरामदायक होते. आम्ही मिळून 6000 हून अधिक धावा केल्या आहेत.', असं शिखर धवनने म्हटलं आहे.
एमएस धोनी भाई मैदानावर अतिशय शांत स्वभावाचा आहे. हा आरामशीर दृष्टिकोन त्याच्या कर्णधारपदाचे वैशिष्ट्य आहे. धोनी आणि विराट या दोन्ही दिग्गजांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने खूप उंची गाठली आणि धोनी आणि कोहली या दोघांनीही असा वारसा सोडला आहे, जो भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कालखंडांपैकी एक म्हणून ओळखला जाईल. मला वाटतं की हे दोघंही अपवादात्मक क्रिकेटपटू आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्यासारखे बनायचंय, असं म्हणत शिखरने दोघांचही कौतूक केलंय.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून मी कसोटी संघात नाही. प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात वयाचा घटकही असतो. मी कसोटी सामने खेळत नसल्यामुळे, मी माझ्या शरीराला विश्रांती देईन आणि खेळाच्या लहान फॉरमॅटसाठी फ्रेश राहीन, असं स्पष्ट मत शिखरने व्यक्त केलंय. क्रिकेट कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय क्षण कोणता? असा सवाल जेव्हा शिखरला विचारला गेला तेव्हा, 'मला अर्जुन पुरस्कार देण्यात आला, तो क्षण माझ्या क्रिकेट कारकिर्दीशी संबंधित माझा सर्वोत्तम क्षण आहे', असं शिखरने म्हटलं आहे.
दरम्यान, अर्जुन पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि त्याच्या संपूर्ण प्रवासात माझे प्रशिक्षक, वैद्यकीय कर्मचारी, सपोर्ट स्टाफ, बीसीसीआय, माझे सहकारी, कुटुंब आणि मित्रांसह माझ्यासोबत राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असं म्हणत शिखरने आभार मानले. वर्ल्ड कप 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 137 धावांची खेळी मला वैयक्तिक आवडते म्हणून आठवते, असा खुलासा देखील शिखरने केला आहे.