कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन पाचव्या वनडेत आणि टी-२०मध्ये खेळू शकणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवन आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी रविवारी मायदेशात येतोय. बीसीसीआयच्या माहितीनुसार, शिखर धवनची आई आजारी आहे मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय.


श्रीलंकेविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आघाडी घेतलीये. श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात शिखर धवनने चांगली कामगिरी केलीये.


दरम्यान, शिखर धवनच्या अनुपस्थिती कोणत्या क्रिकेटरला संधी मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाहीये. श्रीलंकेविरुद्ध एकमेव टी-२० सहा सप्टेंबरला होणार आहे. 


शिखर धवन पाचव्या वनडेत खेळणार नसेल तर त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. अजिंक्य रहाणे श्रीलंकेविरुद्धच्या एकाही वनडेत खेळलेला नाहीये. त्यामुळे शिखरच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.