मुंबई : टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली. यावेळी बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून माहिती दिली. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळायची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सिरीजमधीस पहिला सामना 18 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. याशिवाय इतर दोन सामने 20 आणि 22 ऑगस्टला रोजी खेळवले जातील. केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार असेल. 


31 जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 15 जणांची टीम जाहीर केली. त्यावेळी टीमची कमान शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे सोपवली आहे. काही दिवसांपूर्वी केएल राहुलने फिटनेस टेस्ट पास होऊन केवळ टीममध्ये स्थान मिळवता आलं नव्हतं. यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली होती. या दौऱ्यावर आता धवन टीमचा उपकर्णधार आहे.


दरम्यान, कर्णधारपद गेल्यानंतर सोशल मिडियावर धवनचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये धवन सोफ्यावरच झोपलेला दिसतोय. या फोटोवरून लोकांनी विविध कमेंट्स करत शिखर धवनवर ही काय वेळ आली असं म्हटलंय.



एवढंच नाही तर कर्णधाराशिवाय टीमचे प्रशिक्षकही या दौऱ्यापूर्वी बदललं आहेत. आशिया चषकापूर्वी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती दिल्यानंतर बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेला पाठवलंय.


वनडेसाठी इंडियाचा संघ


केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर