शोएब अख्तरचा 160 KMPH चा विक्रम मोडणार का? Umran Malikन सोडलं मौन
Umran Malikन शोएब अख्तरलाच दिलं आव्हान, तुम्हाला काय वाटतं उमरान मलिक शोएबचा रेकॉर्ड मोडणार का?
मुंबई : आयपीएलमध्ये आणि टीम इंडियात (Team India) जेव्हापासून युवा गोलंदाज उमरान मलिकची (Umran Malik) एन्ट्री झाली आहे, तेव्हापासून त्याची तुलना पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरशी (Shoaib Akhtar) करण्यात येत आहे. त्याचसोबत शोएबचा वेगवान गोलंदाजीचा रेकॉर्ड उमरान मलिकचं मोडू शकतो, असाही दावा केला जात आहे. या रेकॉर्डवर आता प्रथमच उमरान मलिकने मौन सोडलं आहे. तो या रेकॉर्डवर काय म्हणालाय, ते जाणून घेऊयात. (shoaib akhtar 160 KMPH record can umran malik break irani trophy 2022 rest of india beat saurashtra)
शोएबचा रेकॉर्ड काय?
शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान बॉल टाकला आहे. 2003 च्या विश्वचषकात त्याने 161.3 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकून विश्वविक्रम केला होता. ज्याच्या आसपास आजपर्यंत एकही गोलंदाज पोहोचलेला नाही.
उमरान शोएबच्या रेकॉर्डवर काय म्हणाला?
टीम इंडियात (Team India) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत असलेल्या उमरान मलिकने (Umran Malik) शोएबच्या रेकॉर्डवर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “माझे लक्ष सध्या देशासाठी चांगलं परफॉर्म करणं आणि माझ्या संघाला सामने जिंकण्यास मदत करणे यावर आहे.तसेच मी वेगवान गोलंदाजी करेन, पण माझे लक्ष चांगल्या भागात गोलंदाजी करण्यावर आहे. मला खूप शिकायचे आहे, खूप सराव करायचा आहे, असे तो यावेळी म्हणाला आहे.
शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) रेकॉर्ड मोडशील का? यावर उमरान मलिक (Umran Malik) म्हणतो, 'इंशा-अल्लाह... आता लक्ष विकेट घेण्यावर आहे. अल्लाहची इच्छा आणि नशीबात जे असते तेच घडते,असे तो म्हणाला आहे. एकूणच त्याने शोएबचा रेकॉर्ड मोडण्याची तयारी दाखवली आहे.
उमरानने आतापर्यंत किती वेगाने बॉल टाकलाय?
उमरान मलिकने (Umran Malik) आपल्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर फार कमी वेळात टीम इंडियामध्ये (Team India) स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. तसेच उमरानमध्ये 140kph च्या वेगाने सतत गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याचवेळी उमरानने हैदराबादकडून या मोसमात 14 सामने खेळले आणि 22 विकेट घेतल्या आहेत.
इराणी कपमध्ये शानदार कामगिरी
इराणी कप 2022 (Irani Trophy 2022) सौराष्ट्र (Saurashtra) आणि रेस्ट ऑफ इंडिया (Rest of India) यांच्यात खेळवला गेला. ज्यामध्ये रेस्ट ऑफ इंडियाने सौराष्ट्र संघाचा 8 विकेटने पराभव करून इराणी कप जिंकला होता. रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना उमरानने (Umran Malik) शानदार कामगिरी करत पहिल्या डावात 3 विकेट घेतले. या शानदार कामगिरीमुळे तो पुढील मालिकेत टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो.
दरम्यान अद्याप तरी त्याला फार कमी वेळचं टीम इंडियातून (Team India) खेळण्याची संधी मिळाली आहे. जर त्याला पुर्णवेळ संघात संधी मिळाली तर नक्कीच तो शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा फॅन्स व्यक्त करतायत.