मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये दिसतोय. कोणत्याही फॉरमॅटमध्ये विराट रन करण्याच्या बाबतीत मागे नाही. शनिवारी जेव्हा पुण्याच्या मैदानावर त्याने वेस्ट इंडिजच्या विरोधात शतक ठोकलं. तेव्हा लागोपाठ तीसरं वनडे शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी विराटने वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये गुवाहाटी आणि विशाखापट्टनममध्ये देखील शतक ठोकलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या या कारनाम्याने पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर देखील कौतूक करण्यापासून मागे राहिलेला नाही. शोएबने विराटचं कौतूक करतांना ट्विट केलं की, 'गुवाहाटी, विशाखापट्टनम आणि पुणे लागोपाठ तीन शतक ठोकणारा विराट कोहली काही वेगळाच आहे. असं करणारा तो पहिला भारतीय आह. काय शानदार रन मशीन आहे. मी तुझ्यासाठी एक नवीन टार्गेट सेट करत आहे. असंच खेळत राहा आणि 120 शतकांच्या पुढे निघून जा.'


विराट कोहलीने आतापर्यंत 62 शतक ठोकले आहेत. ज्यामध्ये 24 टेस्ट आणि 38 वनडे आंतरराष्ट्रीय शतक आहेत. पुणे वनडेमध्ये त्याने 107 रनची खेळी केली पण टीम इंडियाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. 284 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली भारतीय टीम 240 रनवर ऑल आउट झाली. विराटच्या शिवाय कोणताही भारतीय खेळाडू 40 चा आकडा देखील गाठू शकला नाही.