मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंवर तो वेगवेगळी वक्तव्य करत असतो. आता त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीवर मोठं विधान केलं. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. मी गोलंदाजी करत असतो तर विराट कोहली जास्त धावा करू शकला नसता. 


त्यासोबत आयपीएलमधील खराब फॉर्मवरही शोएब बोलला आहे. त्याने कोहलीला सल्लाही दिला आहे. कोहलीनं आपल्या फलंदाजीवर फोकस करायला हवं अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं असं शोएब बोलला आहे. 


'आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली आहे. मात्र त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याकडे लोक बोट दाखवत आहेत. ही सर्वात वाईट गोष्ट आहे. मला वाटतं की तो एक मजबूत खेळाडू आहे आणि त्याच्याकडे पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची क्षमता आहे.'


'विराटच्या डोक्यात एक नाही तर 10 हजार गोष्टी आहेत. त्याने केवळ आपल्या खेळावर फोकस करायला हवं. तो सतत फ्लॉप ठरला तर त्यालाही टीममधून बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.' 


विराट कोहलीनं शोएबवर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये कोहली म्हणाला होता की, शोएबच्या बॉलचा सामना करण्याची संधी कधी मिळाली नाही. 2010 मध्ये जेव्हा जेव्हा विराट आणि शोएब आमनेसामने टीममधून खेळत होते तेव्हाही कधी तो योग आला नाही. 


जेव्हा शोएब बॉलिंगसाठी यायचा तोपर्यंत विराट कोहली आऊट होत असे. त्यामुळे कोहलीला कधी शोएबच्या बॉलचा सामना करण्याची संधी मिळाली नव्हती. शोएबची बॉलिंग खूपच खतरनाक होती. त्यांच्या बॉलचा सामना करण्याचं धाडस आणि इच्छा कोणत्याच बॅट्समनची नसायची असं विराट कोहली म्हणाला. 


शोएब अख्तरने विराट कोहलीच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. विराट कोहली एक चांगला क्रिकेटर आहे. मोठा खेळाडू कायम मोठ्या गप्पा मारतो असंही शोएब म्हणाला. मी त्याचे मनापासून आभार मानतो. 


पुढे शोएब म्हणाला की, मी जर कोहली विरुद्ध बॉलिंग केली असती तर तो एवढ्या चांगल्या धावा काढू शकला असता का? त्याच्यासाठी हे खूप मोठं आव्हान असतं. आज तो एवढ्या धावा काढतोय त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत ते यामुळेच.


पण शोएबने बोलताना अजून एक गोष्ट सांगितली. मी जर त्याच्या विरुद्ध बॉलिंगसाठी उतरलो असतो. तर जरी विराटकडे 50 शतकं नसती आणि त्याला 20 किंवा 25 शतके करता आली असती, तरी त्या शतकांचे महत्त्व सर्वात जास्त असतं. मी विराट कोहलीकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली असती.