शोएब अख्तरवर लैंगिक शोषणाचा आरोप, माजी क्रिकेटपटूनं स्वत: सांगितलं सत्य
टीममधील सहकारी प्ले बॉय म्हणून माझी खेचायचे पण खरंतर.... शोएब अख्तरनं सांगितलं `त्या` घटनेमागचं सत्य
मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. शोएब अख्तरनेयाबाबत खुलासा केला होता. 2005 रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी बलात्कार आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हॅलो अॅपवर लाइव्ह चॅटदरम्यान याबाबत स्वत: सांगितलं आहे.
या सगळ्या प्रकरणामुळे 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत पाठवण्यात आलं होतं. महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुरुवातीला शोएब अनफिट असल्याचं कारण सांगण्यात आलं.
पण त्यानंतर बातमी आली की शोएब अख्तरवर एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी जूनमधील या घटनेची आठवण करून देत शोएब अख्तरने हेलो अॅपवर लाइव्ह चॅट दरम्यान या दौऱ्यात काय घडले ते सांगितलं होतं.
पाकिस्तान टीममध्ये माझा एक सहकारी होता. तो सहकारी आणि एक महिलेत गैरसमज निर्माण झाला होता. पाकिस्तान टीमच्या व्यवस्थापनानं त्या सहकाऱ्याचं नाव लपवलं. त्या ऐवजी माझं नाव या सगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला.
शोएब अख्तर पुढे सांगताना म्हणाला की, 'माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला दाखल करण्यात आला होता, तर तो दुसऱ्या क्रिकेटपटूने केला होता. त्या क्रिकेटपटूचे नाव पाकिस्तान संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने लपवले आणि मला खेळण्याची संधी न देताच परत पाठवून देण्यात आलं.
'मी तेव्हा पीसीबीला विचारले होते, पण बोर्डाने त्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले नाही किंवा माझे नाव या प्रकरणातून हटवले नाही. सगळे माझ्याकडे संशयाने बघत होते. अख्तर म्हणाला, 'सगळे म्हणाले की शोएब भाई प्ले बॉय आहे.
शोएबच्या म्हणण्यानुसार त्याची चूक नसतानाही त्याला या सगळ्या प्रकरणात अडकवण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर बलात्कारा आरोप असल्याचा ठप्पा लागला होता. त्याची चर्चाही खूप रंगली होती.