ढाका : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शब्बीर रहमाननं सानिया मिर्झाशी छेडछाड केल्याचा आरोप सानियाचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं हे आरोप केले आहेत. याप्रकरणी शोएब मलिकनं क्रिकेट कमिटी ऑफ ढाका मेट्रोपोलीस (सीसीडीएम)च्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. ही घटना ४ वर्षांपूर्वीची आहे. शोएब मलिक सानिया मिर्झासोबत बांगलादेशमध्ये घरगुती स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. याआधीही शब्बीर रहमान अनेक वादांमध्ये सापडला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२०१७ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका प्रेक्षकाशी मारहाण केल्याप्रकरणी आणि अभद्र भाषेचा वापर केल्याप्रकरणी शब्बीर रहमानवर ६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. २६ वर्षाच्या सब्बीरने बांगलादेशसाठी ११ टेस्ट, ५४ वनडे आणि ४१ टी २० चे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बांगलादेश प्रिमिअर लीग दरम्यान रहमान बोर्डाला सूचना न देता त्याच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये घेऊन आला होता. यामुळेही बांगलादेश क्रिकेट बोर्ड नाराज झालं होतं आणि रहमानवर दंडात्मक कारवाई झाली होती.


६ महिन्यांची बंदी घालण्यात आली असल्यामुळे शब्बीर रहमान आशिया कपमध्ये खेळू शकणार नाही. १५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होत आहे.