Sania Mirza birthday: भारतीय टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झा ( sania mirza) आणि पाकिस्तानचा ऑलराऊंडर आणि माजी कर्णधार(Pakistani cricketer)  शोएब मलिक (Shoaib Malik) ही जोडी सध्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहेत. दोघे वेगळे होणार असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये केला जात आहे. तसेच दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचा दावाही शोएबच्या जवळच्या व्यक्तीने केला होता. मात्र सानिया आणि शोएबने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र घटस्फोटांच्या अफवा सुरू असतानाच शोएबने आपली पत्नी सानियाला बर्थडे विश केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएबची पोस्ट झाली व्हायरल 


सानिया आज आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहेत. हिच संधी साधत शोएबने सानियाला रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या (happy birthday) शुभेच्छा दिल्या. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले - तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.  तुला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा. या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या. विशेष म्हणजे या पोस्टची वेळ. रात्री उशिरा 1.15 च्या सुमारास शोएबने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शोएब आणि सानिया एकत्र दिसत आहेत.



शोएब मलिकची ही बर्थडे पोस्ट चांगलीच व्हायरल (viral) होत आहे. सोशल मीडिया युजर्सने आपापल्या अंदाजा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांनी म्हटलेय की दोघांनी असेच हसत राहा. त्याच्या या ट्वीटर काही तासांतच हजारो लाईक्स आले आहेत. तसेच चाहत्यांनी दोघांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली.


वाचा : IPL 2023 संदर्भात मोठी बातमी; दोन दिग्गज खेळाडू स्पर्धेला मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती 


 शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाचे कारण पाकिस्तानी अभिनेत्री (आयशा उमर) आहे, जिच्यासोबत शोएब मलिकने बोल्ड फोटोशूट केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही कायदेशीर अडचणी सोडवल्यानंतर घटस्फोटाची घोषणा करणार आहेत.


घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी मोठी घोषणा केली आहे. दोघेही लवकरच एकत्र दिसणार आहेत. वास्तविक, सानिया आणि शोएब एक टॉक शो आणणार असल्याची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात टेनिस सेन्सेशन सानिया आणि तिचा पती शोएब मलिक एकत्र दिसणार आहेत. त्याने त्याच्या शोचे नावही उघड केलेय. 'मिर्झा मलिक शो' असे या नवीन कार्यक्रमाचे नाव असेल. त्याचे पोस्टरही चांगलेच व्हायरल होत आहे. हा शो पाकिस्तानी वाहिनीवर येणार आहे.