मुंबई : भारतीय महिला टीमनं २०१७च्या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली. फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा पराभव झाला असला तरी महिला टीमनं सगळ्यांचीच मनं जिंकली. पण शोभा डे यांनी या महिला क्रिकेटपटूंनी केलेल्या कामगिरीबद्दल केलेल्या ट्विटमुळे त्या चांगल्याच फसल्या.


देवा, कृपया आमच्या महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिकीकरण आणि लोभापासून वाचवं. यामुळेच आमच्या अनेक पुरुष क्रिकेटपटूंची वाट लागली आहे, असं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. या ट्विटवरून अनेक यूजर्सनी शोभा डेंवर निशाणा साधला. जर महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्या स्टारडमचा फायदा उचलला तर त्यात गैर काय आहे? असे सवाल शोभा डेंना अनेक यूजर्सनी विचारले आहेत.