क्रिकेटच्या LIVE सामन्यात `दंगल`, कुणी बॅट उगारली कुणी स्टंप, हिरॉईनी ढसाढसा रडल्या; पाहा Video
Celebrity Cricket League Fight Video : लीगमध्ये सेलिब्रिटीमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून आलंय. यामुळे 6 जणांना रुग्णालयात भरती देखील करावं लागलं आहे. या हाणामारीनंतर सेमीफायनलपूर्वी लीगच रद्द करावी लागली.
Bangladesh Celebrity Cricket League : लहानपणी अनेकांनी क्रिकेट खेळलं असेल, 'ज्याची बॅट त्याची बॅटिंग' हा प्रत्येक गल्लीमध्ये नियम असतो. त्यात अंपायर आपलाच असेल तर सुट्टीच नाही. मन भरेपर्यंत बॅटिंग करायची अन् कंटाळा आला की सुमडीत बॅट घेऊन निघून जायचं, असा प्रकार लहानपणी सर्वांनी अनुभवला असेल. क्रिकेटमध्ये आजही अनेक निर्णय चुकीचे दिले जातात. त्यावरून वादही पेटतो, वाद टोकाला जातो अन् दंडही दिला जातो. मात्र, तुम्ही जो प्रकार पाहणार आहात, तो क्रिडाविश्वात कधीही झाला नसेल. बांगलादेशमधून (Celebrity Cricket League) एक धक्कादायक माहिती समोर आलीये. बांग्लादेश सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तुंबळ हाणामारी (Fight Video) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता याची तुफान चर्चा होताना दिसत आहे.
बांगलादेश क्रिकेट लीगमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारताप्रमाणे बांगलादेशमध्ये देखील सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळवली जाते. या लीगमध्ये सेलिब्रिटीमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून आलंय. यामुळे 6 जणांना रुग्णालयात भरती देखील करावं लागलं आहे. या हाणामारीनंतर सेमीफायनलपूर्वी लीगच रद्द करावी लागली आहे. हा सर्व राडा झाला अंपायरच्या एका निर्णयामुळे...
नेमकं काय झालं?
मुस्तफा कमाल राज आणि दीपंकर दीपोन यांच्या दोन संघात सामना खेळवला जात होता. सामना सुरू असताना एक फोर दिला न गेल्याने खेळाडूंनी आक्षेप घेतला. त्यावेळी खेळाडूंमध्ये वादावादी सुरू झाली. शाब्दिक वाद हळूहळू हाणामारीवर पोहोचला अन् लाईव्ह सामन्यात थेट दंगल पहायला मिळाली. कुणी बॅट घेऊन मारायला आलं तर कुणी स्टंप घेऊन आल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. शिशिर सरदार, राज रिपा, जॉय चौधरी, अतिक रहमान, शेख शुभो आणि आशिक जाहिद अशी जखमींची नावे आहेत.
पाहा Video
दरम्यान, माझ्या कारकिर्दीला काही झालं तर मुस्तफा कमल राज जबाबदार असतील असं राज रिपा यांनी सांगितलं आहे आणि त्याच्या टीमने तिच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्याचा आरोपही केला आहे. लाईव्ह सामन्यात अभिनेत्री रडताना देखील दिसल्या आहेत. एका फोरवरून एवढा राडा घालणारी बांगलादेश क्रिकेट लीग सध्या मस्करीचा विषय बनली आहे.