मुंबई : इंडियन टीममध्ये खेळण्याचे अनेक तरुणांचं स्वप्न असतं, ते तेवढी मेहनत देखील करतात. परंतु सगळ्यांना हे शक्य होत नाही. बाहेर इतकं जास्त कॉम्पीटिशन आहे. की बऱ्य़ाच गोष्टी तुमची मेहनत आणि तुमच्या लक वरती डिपेंड असतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की जेवढं कठीण टीम इंडियामध्ये जागा मिळवणं आहे, त्याहून कठीण टीममध्ये जागा टिकवणं असतं. त्यामुळे यासाठी मोठमोठ्या खेळाडूला देखील अनेक संघर्ष करावे लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा असा एक खेळाडू आहे, ज्याचे करिअर संकटात आहे आणि टीम इंडियाचे दरवाजेही त्याच्यासाठी जवळपास बंद झाले आहेत.


टीम इंडियाचा खेळाडू मनीष पांडे बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. अनेकवेळा त्याला संधी देण्यात आली, पण प्रत्येक वेळी तो फ्लॉप ठरला.


मनीष पांडेने टीम इंडियासाठी आतापर्यंत 39 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 44.31 च्या सरासरीने आणि 126.15 च्या स्ट्राइक रेटने 709 धावा केल्या आहेत. मनीष पांडे कधीही कॉन्स्टंट खेळाला नाही, ज्यामुळे तो टीममध्ये सतत येत, जात राहिला.


तसेच आता त्याचा खेळ पाहाता तो पुन्हा टीममध्ये परत येईल असे वाटत नाही. आयपीएल 2021 मध्येही मनीष पांडे सनरायझर्स हैदराबाद संघासाठी कमकुवत खेळाडू ठरला.


मनीष पांडेच्या फ्लॉप फलंदाजीमुळे संपूर्ण मधली फळी उद्ध्वस्त झाली, त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. हा खेळाडू एकेकाळी टीम इंडियाचे भविष्य मानला जात होता, परंतु त्याची बॅट त्यानंतर फारशी काही चालली नाही. मनीष पांडेने टीम इंडियासाठी शानदार पदार्पण केले.


त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 86 चेंडूत 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने सिडनीत 81 चेंडूत 104 धावा करत संघाचा विजय निश्चित केला. मात्र त्यानंतर तो टीम इंडियाच्या आत-बाहेर जात राहिला. दुखापतीने त्याच्याकडून अनेक मोठ्या संधी हिरावून घेतल्या. शानदार सुरुवातीचे त्याला मोठ्या कारकिर्दीत रूपांतर करता आले नाही.


यावेळच्या आयपीएल लिलावात मनीष पांडेला लखनऊ सुपरजायंट्सने 4.6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मनीष पांडेचा संघात समावेश करणे लखनऊ सुपरजायंट्ससाठी मोठे धोक्याचे ठरू शकते. यावेळी मनीष पांडेला सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावात नाकारले, कारण गेल्या मोसमात मनीष पांडेने हवी तशी कामगिरी केली नाही.


आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय


आधी कोलकाता नाइट रायडर्स आणि नंतर सनरायझर्स हैदराबादसाठी अनेक धावा करणाऱ्या मनीष पांडेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. 2009 मध्ये, आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.


डेक्कन चार्जर्स हैदराबादविरुद्ध त्याने अवघ्या 73 चेंडूत नाबाद 114 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 10 चौकार आणि चार षटकार होते. अनिल कुंबळे तेव्हा आरसीबीचा कर्णधार होता.