मुंबई :  मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरला न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या टी-२० सिरीजसाठी टीम इंडियात सामिल करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयसने अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण स्थानिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मागील टेस्ट दौऱ्यात धर्मशाला टेस्टसाठी टीम इंडियात घेतले होते. पण अंतीम ११ मध्ये त्याला स्थान मिळाले नाही. 


पण आता त्याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. श्रेयस अय्यर हा राहुल द्रविडचा खूप मोठा चाहता आहे. तो आपल्या यशाचे श्रेय राहुल द्रविड याला देतो.  तो म्हणतो की राहुलने शिकवले की स्वतः शांत राख आणि त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको की ज्या तुझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. 


श्रेयस अय्यरच्या निवडीवर निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी सांगितले की अय्यर प्रत्येक फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. फर्स्ट क्लास असो, वन डे किंवा टी-२० त्याची कामगिरी शानदारच आहे. आम्ही एखाद्या खेळाडूला निवडतो तेव्हा आम्ही त्याला जास्त संधी देऊ इच्छितो, असेही प्रसाद म्हणाले. 


पाच सामन्यात २१३ धावा 


गेल्या काही महिन्यांत प्रथम दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या विरूद्ध खेळविण्यात आलेल्या सिरीजमध्ये श्रेयसने २१३ धावा काढल्या आहेत. त्यात त्याने दोन शतक झळकावले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एका सराव सामन्यात त्याने द्विशतक झळकावले होते. 


आयपीएलमध्ये खरेदी केले २.६ कोटी रुपयांना 


२२ वर्षांच्या अय्यर मुंबई टीमकडून रणजी खेळतो आहे. २०१५ मध्ये अय्यरवर आयपीएलची बोली लावण्यात आली. त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमने २.६ कोटी रुपयांत खरेदी केले. अय्यर आतापर्यंत. ३८ प्रथम श्रेणी सामने खेळला आहे.  त्याने ५५ सरासरीने ९ शतकांसह ३३६६ धावा बनविल्या आहेत. 


४१ टी -२० सामने... 


श्रेयसने आतापर्यंत ४१ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १२५ च्या दमदार स्टाइक रेटने ७ शतकांसह ९५१ धावा केल्या आहेत.