मॅचविनर श्रेयर अय्यर टीमबाहेर का?; रोहित शर्माने दिलं उत्तर
कालच्या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेईंग 11मध्ये समाविष्ट न केल्याने प्रश्न उपस्थित केले जातायत.
मुंबई : टीम इंडियाने टी-20 सिरीजची सुरुवातही विजयाने केली आहे. भारताने वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने सिरीजमध्ये 1-0 ने आगेकूच केली आहे. दरम्यान या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेईंग 11मध्ये समाविष्ट न केल्याने प्रश्न उपस्थित केले जातायत. यावर कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिलंय.
रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला खेळाच्या मध्ये गोलंदाजी करणारा एखादा खेळाडू हवा होता. यासाठी पहिल्या सामन्यात प्लेईंग 11मध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत यापेक्षा मी आव्हानांचा सामना करण्यावर भर देतो. त्यामुळे आम्ही श्रेयससंदर्भात निर्णय घेतला होता.
श्रेयसऐवजी या खेळाडूला जागा
श्रेयस अय्यरऐवजी टीम इंडियामध्ये वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) संधी देण्यात आली होती. अय्यरने एक ओव्हरमध्ये केवळ 4 रन्स दिले. कालच्या एका क्षणी टीम इंडिया कठीण परिस्थितीत दिसत असताना वेंकटेश अय्यरने टीमला काही प्रमाणात सांभाळलं. शिवाय त्या नाबाद 24 रन्सही केले.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला 158 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विंडीजसाठी यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 43 चेंडूत 5 षटकारांसह 61 धावा केल्या. काईलने 31, रोस्टन चेसने 4 धावा, रोमन पॉवेल 2 धावा आणि अकील हुसेनने 10 धावांचे योगदान दिले.
किरॉन पोलार्डने शेवटी फटाक्यांची आतषबाजी खेळली. त्याच्यामुळेच वेस्ट इंडिज भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊ शकला. किरॉन पोलार्डने 19 चेंडूत 24 धावा केल्या.
भारताकडून रोहित शर्माने 19 बॉलमध्ये 40, इशान किशनने 42 बॉलमधये 35, विराट कोहलीने 13 बॉलमध्ये 17 तर ऋषभ पंतने 8 रन केले. सुर्य़कुमार यादवने 18 बॉलमध्ये 34 आणि वेंकटेश अय्यरने 13 बॉलमध्ये 24 रनची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.