मुंबई : रोहित शर्माकडे टीम इंडियाचं कर्णधारपद जाणं हे काही खेळाडूंच्या पथ्यावर पडलं आहे. रोहितमुळे पुन्हा काही खेळाडूंना नव्या उमेदीनं खेळण्याची संधी मिळाली. रोहित शर्माकडे तिन्ही फॉरमॅटची सूत्र आल्यानंतर त्याने एकामागे एक सलग सामने जिंकले आहेत. त्याचं कौतुक देखील होत आहे. माजी कर्णधार विराट कोहलीला आता फलंदाजीसाठी स्कोप असूनही त्याचा परफॉर्मन्स अजूनही डाऊन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता विराट कोहलीला टक्कर देण्यात टीम इंडियामध्ये स्फोटक फलंदाज आला आहे. त्यामुळे कदाचित कोहलीची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आपला सलग उत्तम फॉर्म मैदानात दाखवत आहे. त्यामुळे आता कोहलीच्या जागेवर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर श्रेयसला मैदानात उतरण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


रोहित शर्मा कर्णधारपदावर येताच श्रेयस अय्यरचं भाग्य बदललं. श्रेयसची कामगिरीही अधिक उत्कृष्ट होत असल्याचं दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सीरिजमध्ये जडेजानंतर सर्वाधिक धावा श्रेयसने केल्या आहेत. अय्यर आता कसोटी, वन डे आणि टी 20 तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम खेळत आहे. त्यामुळे त्याने टीम इंडियातील आपलं स्थान अधिक भक्कम केलं आहे. 


युजवेंद्र चहलची राजस्थान रॉयल्सला मोठी धमकी, म्हणाला 'मी अकाऊंट...'


कोहलीच्या जागा धोक्यात?


टीम इंडियामध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी विराट कोहली उतरतो. मात्र सध्या तो सतत खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर त्याची जागा घेऊ शकतो. कोहलीला त्याच्या खराब फॉर्मचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विराट कोहलीचा पत्ताही कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून 204 धावा केल्या. त्याने तीन अर्ध शतकं ठोकली. पहिल्या टी 20 सामन्यात 57 दुसऱ्यामध्ये 74 तर तिसऱ्या सामन्यात 73 धावा केल्या. 


रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या करकीर्दीमध्ये श्रेयस अय्यरला विशेष संधी देण्यात आली नाही. मात्र रोहित शर्माने अय्यरला संधी दिली आणि त्याने सोनं केलं. आता आयपीएलमध्ये कोलकाता संघाचा अय्यर कर्णधार आहे.