Shreyash Iyer KKR Captain in IPL 2024 आयपीएलचा महत्त्वापूर्ण असा लिलाव येत्या 19 डिसेंबरला (IPL 2024 Auction) दुबईमध्ये पार पडणार आहे. अशातच आता कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शाहरुख खानच्या या निर्णयामुळे केकेआरच्या चाहत्यांना सुखद धक्का बसलाय. कोलकातानं आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात संघाचं नेतृत्व करणाऱ्या नितीश राणा (Nitish Rana) याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं असून आता पुन्हा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी घोषणा केली की, श्रेयस अय्यर केकेआरचा कर्णधार आणि नितीश राणा उपकर्णधार असेल. श्रेयस दुखापतीमुळे आयपीएल 2023 ला मुकला हे खरोखरच दुर्दैवी आहे. तो परत आला आहे आणि कर्णधार म्हणून तो आला आहे याचा आम्हाला आनंद आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने ज्याप्रकारे मेहनत घेतली आहे आणि त्याचा फॉर्म आहे, तो त्याची वृत्ती दाखवतो. उपकर्णधार म्हणून नितीश टीम केकेआरच्या फायद्यासाठी श्रेयसला शक्य तितक्या सर्व प्रकारे पाठिंबा देईल यात शंका नाही, असंही केकेआरकडून सांगण्यात आलंय.


Shreyas Iyer म्हणतो...


माझा विश्वास आहे की, गेल्या मोसमात दुखापतीमुळे माझ्या अनुपस्थितीसह अनेक आव्हानं आमच्यासमोर होती. नितीशने केवळ माझ्यासाठीच नव्हे तर त्याच्या प्रशंसनीय नेतृत्वानंही खूप चांगलं काम केलंय. केकेआरने त्याला उपकर्णधार म्हणून निवडलं याचा मला आनंद आहे, असं श्रेयस अय्यर याने म्हटलं आहे.



कोलकाता नाईट रायडर्स


कायम ठेवलेले खेळाडू : आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.


सोडलेले खेळाडू : आर्या देसाई, डेव्हिड विसे, जॉन्सन चार्ल्स, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास, लॉकी फर्ग्युसन, मनदीप सिंग, एन. जगदीसन, शाकिब अल हसन, शार्दुल ठाकूर, टिम साऊदी, उमेश यादव.