Shubhman Gill 25th Birthday : भारतीय क्रिकेट टीममधला प्रिन्स म्हणून ओळखला जाणारा स्टार फलंदाज शुभमन गिल याचा आज 25 वा वाढदिवस आहे. शुभमन गिल याने कमी वयातच टी 20, वनडे आणि टेस्ट अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले. तसेच कमी वयातच त्याच्यावर भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली. त्याने झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान टीम इंडियाचे नेतृत्व केले. एवढ्या लहान वयात शुभमन गिल टीम इंडियासाठी असा खेळाडू बनला आहे, ज्याच्याशिवाय लाइन अप अपूर्ण आहे. 25 वर्षांच्या शुभमन गिलची फॅन फॉलोईंग सुद्धा जबरदस्त असून त्याने क्रिकेट आणि जाहिरातींमधून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. 


किती आहे शुभमन गिलची नेटवर्थ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट, मॅच फी आणि जाहीरांतींमधून करोडो रुपये कमावतो. शुभमन गिलची मुख्य कमाई ही बीसीसीआय आणि आयपीएल मधून मिळणाऱ्या सॅलरीमधून होत असते. शुभमन गिलकडे बीसीसीआयच ग्रेड ए चं कॉन्ट्रॅक्ट आहे. ज्यामधून त्याला वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. तर गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलला दरवर्षी 8 कोटी रुपये मिळतात.  


हेही वाचा : VIDEO : ऋषभ पंतने दिला गुलीगत धोका, प्रतिस्पर्ध्यांच्या टीममध्ये घुसखोरी करून केला शुभमनचा गेम


 


शुभमन गिल अनेक कंपन्यांचा ब्रँड अँबॅसिडर : 


शुभमन गिलची फॅन फॉलोईंग खूप मोठी असणं तो तरुणांमध्ये फार लोकप्रिय आहे. यामुळे शुभमन गिल अनेक बड्या कंपन्यांचा ब्रँड अँबॅसिडर असून तो त्यांच्या जाहिरातींमध्ये दिसून येतो. नुकतंच शुभमन गिल हा beat electronics या अमेरिकन ऑडिओ प्रॉडक्ट कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर बनला आहे. तसेच शुभमन हा मित्राच्या स्टार्टअपमध्ये शेअरहोल्डर देखील आहे. अशाप्रकारे शुभमन लहान वयातच चांगला गुंतवणूकदार बनला आहे.


शुभमनचं लग्झरी कार कलेक्शन : 


शुभमन गिल हा लग्झरी कारचा चाहता आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टॉप मॉडलची महिंद्रा थार आहे. ज्याची किंमत जवळपास 18 लाख रुपये आहे. तर त्याच्याकडे सुमारे 80 लाख रुपयांची रेंज रोवर कार सुद्धा आहे. तर या शिवाय गिलकडे मर्सिडीज बेंज E350 ही कार असून त्याची किंमत जवळपास 1 कोटी रुपये आहे.